Uncategorizedविशेष

मातोश्री रत्नप्रभा मोहनलालजी खाबिया यांना ‘नवदुर्गा पुरस्कार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्यरत राहणाऱ्या मातोश्री रत्नप्रभा मोहनलालजी खाबिया यांचा सन्मान ‘नवदुर्गा पुरस्काराने’ होणार आहे. भवानी माताजी जैन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार खाबिया यांना जाहीर झाला असून सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील भवानी माता मंदिर, भिलारवाडी, कात्रज येथे पार पडणाऱ्या समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे.
मातोश्री रत्नप्रभा खाबिया या जैन समाजातर्फे विविध सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहून समाजकल्याणासाठी कार्यरत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी घेतलेली पुढाकार, शैक्षणिक मदतीसाठी केलेले प्रयत्न तसेच गरीब व गरजूंच्या सेवेसाठी त्यांचा असलेला उत्साह उल्लेखनीय आहे.
रत्नप्रभा खाबिया या शिरूरचे दिवंगत माजी उपनगराध्यक्ष मोहनलाल खाबिया यांच्या पत्नी आहेत. तर शरद कला क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया व्यावसायिक वर्धमान खाबिया, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया, मनीषा मनीषा बेदमुथा व नीलिमा गोठी यांच्या मातोश्री होत.

सन्मान समारंभासाठी पुणे शहरासह विविध जिल्ह्यांतून मान्यवर, समाजबांधव व खाबिया परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button