क्राईम
Check Also
Close
शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांडोह (ता. शिरूर) येथे घरफोडी करून स्वतःच्या आईचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या मुलाला शिरूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. आरोपीकडून सुमारे ५ लाख ५ हजार रुपयांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रविंद्र दत्तात्रय जाधव (वय ३३, रा. चांडोह, ता. शिरूर) याच्यावर संशय निर्माण झाला.




