क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}रांजणगाव एमआयडीसी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी वापरायची साधने, शस्त्रे, सहा मोबाईल तसेच तीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


आरोपींची नावे सुरेशभाई प्रभुभाई धामेचा, जितेंद्र दिनेश डाभी, मेहल सुरेशभाई धामेचा, भरतभाई देवजीभाई सोळंकी, उत्सव जितेंद्रभाई डाभी आणि भरतभाई जिवराजभाई कोळी अशी असून ते सर्वजण गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी आहेत.
एमआयडीसी मधील बंद पडलेल्या कंपनीमध्ये स्क्रॅप व मातीमधून मौल्यवान धातू मिळू शकतो, या संशयावरून ते चोरीसाठी आले असल्याची आरोपींनी कबुली दिली.

