

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि. १६) सकाळी कर्मचाऱ्यांशी झालेल्या धक्काबुक्की व शिवीगाळीच्या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अर्धा तास कामबंद आंदोलन केले. रुग्णालयात सुरक्षेसाठी गृहरक्षक दलाचे जवान नेमावेत, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि कर्मचारी व रुग्ण दोघांच्याही सुरक्षिततेसाठी रुग्णालयात पोलीस प्रशासनाने गृहरक्षक दलाचे जवान नेमावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.प्रशासनाने याबाबत आश्वासन दिल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने आंदोलन मागे घेण्यात आले.



