
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}बाबुरावनगर येथील डेक्कन स्कूल मध्ये पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधील जैव रसायन शास्त्र विभाग, महाराष्ट शासन आरोग्य विभाग व डेक्कन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पालकांचे बॉडी मास इंडेक्स, रक्तगट , रक्तातील साखर, थायरॉईड, कॅन्सर आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच डॉ. सुनीता पोटे, डॉ. वैशाली साखरे, डॉ. डफळ आदी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी समुपदेशन केले.
या शिबिरासाठी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधील जीवरसायन शास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. किरण फुलझेले , डॉ. किर्ती चिंतामणी यांच्या सह पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांनी नियोजन केले.
त्याचसोबत शिरूर येथील आरोग्य केंद्रातील तंत्रज्ञ श्रीराम पवार व सहकाऱ्यांनी देखील नियोजनात सहभाग घेतला. या शिबिरात 400 हून अधिक पालकांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ समीर ओंकार व डेक्कन स्कूल च्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.



