महाराष्ट्र

काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद

शिरूर {डेली न्यूज पोस्ट 24}काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाल्याची घटना घडली. प्रकाश सुरेश कुलकर्णी यांच्या

शेतात वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात ही मादी बिबट अडकली. संबंधित घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जेरबंद करण्यात आलेली बिबट मादी असून तिचे वय अंदाजे चार वर्षे असल्याची माहिती वनधिकरी निळ कंठ गव्हाणे यांनी दिली. देण्यात आली. सदर बिबटला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून वनविभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button