राष्ट्रीय

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}१५ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या सेनादिनानिमित्त दक्षिण कमांडच्या कमांड हेडक्वार्टर येथे आयोजित कार्यक्रमात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेटरन व तर्डोबाचीवाडी ता. शिरूर चे माजी सरपंच बी. जी. पाचर्णे यांना लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’ प्रदान करण्यातआले .

याच कार्यातून तत्कालीन सैनिक कल्याण मंत्री दादा जाधवराव यांच्या सहकार्याने तसेच संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार अनेक सैनिकांच्या पेन्शन प्रक्रिया सुरू झाल्या. शिरूर तालुक्यातील सुमारे ७० सैनिकांना स्वतःच्या खर्चाने संबंधित कार्यालयात नेऊन पेन्शन सुरू करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यापैकी आजही १७ ज्येष्ठ सैनिक या योजनेचा लाभ घेत असून सध्या त्यांना दरमहा दहा हजार रुपयांची पेन्शन मिळत आहे.

