राजकीय
शिरूर नगरपालिका उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवड शुक्रवारी १६ जानेवारीस
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून, याच दिवशी तीन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड केली जाणार आहे. त्यामुळे शिरूरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.
अलीकडेच पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे यांनी विजय मिळवला. या विजयामुळे शिरूर नगरपालिकेत युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याचे मानले जात आहे.
यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी चिन्हांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले असून, सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ७ नगरसेवक निवडून आले असून, एका अपक्ष नगरसेविकेचा पाठिंबा मिळाल्याने या गटाचे संख्याबळ ८ झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) चे ५ नगरसेवक निवडून आले आहेत.



