महाराष्ट्र
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}माझी मराठी शाळा व मातृभाषेतून शिक्षण याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तेजस्विनी फाउंडेशनच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. घरातील महिलांचे प्रबोधन म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे प्रबोधन ही संकल्पना लक्षात घेऊन सर्व महिलांसाठी शिरूर क्रांतीज्योती विद्यालय, या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते.





