महाराष्ट्र

शिरूर नगरपालिकेच्या विविध समित्यांवर सभापतींची निवड

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकांमध्ये सत्तासमीकरणाचे स्पष्ट चित्र समोर आले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मितेश गादिया यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक ११ जागांसह मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ७ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला ५ जागा मिळाल्या होत्या. एका अपक्ष नगरसेविकेने अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या संख्याबळात वाढ होऊन ते ८ वर पोहोचले होते.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर विविध समित्यांच्या सभापतीपदाबाबत उत्सुकता होती
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे,
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुनील शंकरराव जाधव,
स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी एजाज बागवान,
पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी डॉ. सुनीता पोटे,
शिक्षण समितीच्या सभापतीपदी मितेश गादिया,
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आयेशा सय्यद,उपसभापती स्वप्ननाली जामदार
तर शहर नियोजन विकास , गृहनिर्माण झोपडपट्टी तसेच टपरी पुनर्वसन समितीच्या सभापतीपदी स्वाती साठे यांची निवड झाली.
निवडीनंतर नूतन सभापतींचे नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया आणि मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी अभिनंदन केले. नगरपरिषदेतील नव्या समित्यांच्या माध्यमातून शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.o

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button