राष्ट्रीयविशेष

वंदे मातरम गीताला १५० वर्षं पूर्ण झाल्या निमित्त शिरूर येथे कार्यक्रम

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याचा निमित्ताने दिनांक ७ नोव्हेबर २०२५ रोजी शिरूर शहरातील रयत शाळेच्या मैदानावर सामूहिक वंदे मातरम गीताचे गायन व अन्य कार्यक्रम होणार असून या संदर्भातील कार्यक्रमाचा आढावा व नियोजना संदर्भात शिरूर तहसिल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ७ नोव्हेंबरला वंदे मातरम् या गीताच्या सर्व कडव्यांचे गायन होणार आहे.
यासंदर्भात तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून तहसीलदार बाळासाहेब म्हस्के अध्यक्ष असून संतोष गोसावी हे सचिव आहेत.
या कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात
तहसिल कार्यालयात झालेल्या बैठकीस
नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, गट शिक्षणाधिकारी बालकृष्ण कळमकर, विठ्ठल वाघ,संजय पारडे, दिनकर जाधव, मुख्याध्यापक झेंडू पवार, ए. के. परदेशी, अर्जुन खराबे, प्रा. सतिश धुमाळ, बापुराव जगन्नाथ मोहर,
गायकवाड. एम. एस, प्रचार्य संजय मचाले, स्नेहल शिंदे आदी उपस्थित. होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button