विशेष
शिरुर शहरास दिवसाआड पाणीपुरवठा
शहरास पाणीपुरवठा होणा-या कोल्हापूर बंधारात १०ते १२ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शिरुर शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या घोडनदीवरील कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यातील पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहीला असल्याने व सद्य परिस्थितीमध्ये बंधा-यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसर करुन वापरणे आवश्यक असल्या कारणाने शिरुर नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेतुन शहरास गुरुवार दिनांक १५ मे पासून एक दिवसाआड पुरवठा केला जाणार
असल्याचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले .
ते म्हणाले कुकडी पाटबंधारे विभागाकडे कोल्हापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सद्यपरिस्थितीमध्ये बंधा-यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसर करुन वापरणे आवश्यक आहे.
या परिस्थितीमध्ये उपाययोजना म्हणून गुरुवार दि. १५ मे २०२५ पासून शिरुर नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेतुन शहरास एक दिवसाआड पुरवठा केला जाणार आहे. म्हणजेच गुरुवारी दिनांक १५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील व शुक्रवारी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपुन व काटकसरीने करावा. तसेच ज्या नळ कनेक्शन धारकांनी नळाला तोट्या लावलेल्या नाहीत, त्यांनी नळाला तोट्या बसवुन घ्याव्यात व पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच नळ कनेक्शनला विज मोटार लावुन जास्तीचा पाणीसाठा करु नये.
वीजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या नियमित वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करणेत येईल असे ही त्यांनी सांगितले .
दरम्यान शिरुर शहराचा पिण्याचा पाण्यासाठी पहिले पाण्याचे आवर्तन ११ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ ला आले होते . त्यानंतर २४ मार्च २०२५ ते २८ मार्च २०२५ ला दुसरे पाणी आवर्तन आले . शिरुरच्या कोल्हापूर पध्द्तीचा बंधाराची पाणी साठवण क्षमता ५५ द. ल . घनफूट इतकी आहे .उन्हाळ्यात बंधारा पाण्याने भरल्यावर हे पाणी ४५ ते ५० दिवस पुरते . बंधारातील काही पाण्याचे बाष्मीभवन होते . तर काही पाणी शेतीसाठी शेतकरी घेतात. त्यामुळे बंधारातील पिण्याचे पाणी कमी होते .
यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी व अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे . शिरुरच्या घोडनदी बंधारात पाणी सोडण्याबाबत २ मेला संबधित विभागाला पत्र देण्यात आले . आमदार माउली कटके ही शिरुरचा बंधारात पाणी सोडावे म्हणून पाठपुरावा करीत असून बंधारात पाणी सोडण्याची मागणी त्यांनीही केली आहे .
दरम्यान सध्या बंधारात १० ते १२ दिवस पुरेश एवढ्या पाणीसाठा असून शहरातील ३२ पाण्याचा हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी पाटील व पाणीपुरवठा विभागाचे भूषण कडेकर यांनी सांगितले .