धार्मिंक
शिरूरमध्ये स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त रक्तदान व नेत्रतपासणी, महाप्रसाद सह विविध धार्मिक कार्यक्रम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने शुक्रवार (दि. २० मार्च) रोजी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते सायंकाळी ९ या वेळेत करण्यात आले आहे. सकाळी १०वाजता शिबीरास सुरुवात होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत प्रीतम प्रकाश नगर परिसरात पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत महाआरती व प्रकटदिन सोहळा पार पडणार आहे. तसेच सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मंदिर, प्रीतम प्रकाश नगर येथे होणार असून, भाविकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.






