धार्मिंक

शिरूर येथे दिनांक 24 मार्च ते 31 मार्च या कालावधीत जैन संत व प्रसिद्ध कथाकार रमणीक मुनिजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून” महावीर गाथा “व्याख्यानमाला

श्री जैन पंचायत भवन येथे व्याख्यानमाला

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित ‘महावीर गाथा’ या व्याख्यानमालेचे आयोजन घोडनदी येथे करण्यात आले आहे.
जैन संत व प्रसिद्ध कथाकार रमणीक मुनिजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून ही व्याख्यानमाला मंगळवार, दि. २४ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत पार पडणार आहे.
घोडनदी येथील पंचायत भवन, जुन्या नगरपालिकेसमोर या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात महावीरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, अहिंसा व सत्याचे तत्वज्ञान यांचे सखोल विवेचन करण्यात येणार आहे.
या व्याख्यानमालेस  नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री. सकल जैन समाज, घोडनदी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button