विशेष

शिरूर येथील डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक कार्य आढावा

डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून या संस्थेची पायाभरणी 1884 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केली. राष्ट्रभक्ती असलेले नागरिक तयार करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक क्रांतिकारक याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या शैक्षणिक संस्थांमधून तयार झाले. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा. सन 1903 ते 1905 या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि याच कालावधीत त्यांनी डेक्कन जिमखाना येथे परदेशी वस्तूंची होळी केली होती .अनेक क्रांतिकारक याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीने तयार केले . स्वातंत्र्योत्तर काळातही देशाचे नेतृत्व करू शकणारे राजकीय नेतृत्व साहित्यिक क्रीडापटू शिक्षणतज्ञ याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीने तयार केले. दिवंगत पंतप्रधान श्री पी व्ही नरसिंहराव व श्री व्ही पी सिंग यांच्या रूपाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दोन पंतप्रधान देशास दिले. मागील 142 वर्षात डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचे मापदंड तयार केले असून संस्थेच्या अनेक शाळा व महाविद्यालयांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, डी इ एस पुणे युनिव्हर्सिटी, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, सांगलीतील विलिंग्डन कॉलेज व चिंतामणराव व्यापार महाविद्यालय मुंबईतील कीर्ती कॉलेज ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नावाजलेली शैक्षणिक संकुले आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे व रमणबाग प्रशाला पुणे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त केली आहेत.

शिरूर व परिसराचा औद्योगीकरणामुळे होणारा वाढता विकास लक्षात घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीने 2016 साली शिरूर मध्ये शैक्षणिक संकुल सुरू करण्याचा निर्णय घेतला. 142 वर्ष जुन्या डेक्कन एजुकेशन सोसायटीने सर्वसामान्यांना परवडणारे परंतु दर्जेदार शिक्षण शिरुरकरांना प्राप्त व्हावे या उद्देशाने शिरूर बायपास येथील गंगा पेट्रोल पंपाच्या मागे, टॉवर लाइन येथे सहा एकरामध्ये विस्तीर्ण शैक्षणिक संकुल उभारले आहे. देशाप्रती प्रेम असणारे सुसंस्कारित जबाबदार नागरिक तयार करणे हाच या शैक्षणिक संकुलाचा मुख्य उद्देश आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या नावाने परिचित असणाऱ्या या शैक्षणिक संकुलात सुसज्ज शैक्षणिक इमारत दिमाखात उभी आहे . या इमारतीतील सर्वच वर्गखोल्या हवेशीर व नैसर्गिक प्रकाशाने परिपूर्ण आहेत. छोट्या गटातील विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांच्या उंचीनुसार सुयोग्य असे बेंचेस आहेत. तसेच कार्टून्स, कविता, अंक, अक्षरे यांनी सजलेल्या बोलक्या भिंती लहान मुलांना आकर्षित करतात. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट असून दररोज पाण्याची मानके तपासली जातात. उन्हाळ्यात मुलांसाठी कुलरच्या माध्यमातूनव थंड पाण्याची सोय देखील उपलब्ध आहे. शाळेमध्ये मुलांसाठी आधुनिक स्वच्छतागृहे उपलब्ध असून त्याच्या दैनंदिन सफाईकडे विशेष लक्ष दिले जाते. विस्तीर्ण पटांगण व आजूबाजूला असलेल्या वनराईमुळे तयार होणारे अल्हाददायक वातावरण यामुळे विद्यार्थी निश्चितच या शैक्षणिक संकुलात रमून जातो . तसेच सर्व बाजूनी असणारी संरक्षण भिंत व 60 सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे असणारे भयमुक्त वातावरण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व सर्वांगीण विकासासाठी पोषक ठरते. शाळेच्या आवारात लहान मुलांसाठी अत्याधुनिक क्रीडा साहित्याने युक्त वेगळे प्ले फिल्ड आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना खेळताना इजा होऊ नये म्हणून सॅन्ड बाथ व सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध आहे. त्याचबरोबर खो खो, कबड्डी , हॉलीबॉल यासारख्या खेळांसाठी लाल मातीचे मैदान उपलब्ध आहे. याशिवाय चार एकरचे विस्तीर्ण क्रिकेट पीच, फुटबॉल, जॉगिंग ट्रॅक असणारे शिरूर शहरातील एकमेव विस्तीर्ण मैदान या शाळेस प्राप्त झाले आहे. मल्लखांब हा क्रीडा प्रकार शिकवणारी ही शिरूर मधील एकमेव शाळा आहे.

शैक्षणिक गुणवत्ता

शाळेमध्ये उच्च शैक्षणिक दर्जा निर्माण करण्यासाठी संस्थेच्या मान्यता प्राप्त शाळांनी विकसित केलेला अभ्यासक्रम येथे राबवला जातो. शाळेने ब्लेंडेड अभ्यासक्रम स्वीकारला असून यामध्ये एनसीईआरटी व राज्य शिक्षण परिषद यांनी प्रमाणित केलेला अभ्यासक्रम संयुक्तरित्या राबवला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी विज्ञान व गणित या विषयांचा एनसीईआरटी चा अभ्यासक्रम शिकविला जातो. शाळेतील सर्व शिक्षक हे उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असून बीएड , डीएड व मॉन्टेसरी कोर्स पूर्ण झालेले आहेत. शिक्षकांची निवड ही केंद्रीय निवड समितीमार्फत त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून होत असल्यामुळे सर्व शिक्षक हे उच्च शैक्षणिक क्षमता सिद्ध करूनच निवडले जातात. शाळेचे प्राचार्य डॉ समीर ओंकार हे स्वतः उच्चविद्याविभूषित असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयाची पीएचडी पदवी प्राप्त केली आहे . तसेच पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचा सोळा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रातील अनुभवाचा फायदा शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना होत आहे. विद्याभारती, ज्ञानप्रबोधिनी आदी संस्थांच्या माध्यमातून शिक्षकांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची विविध बौद्धिक कौशल्य विकसित करण्यासाठी पाठांतर , लिखाण, वाचन, प्रोजेक्ट , शैक्षणिक उपक्रम , क्षेत्रभेट यासारखी विविध शैक्षणिक साधने वापरली जातात. त्याचबरोबर अध्यापनासाठी स्मार्ट बोर्ड, डिजिटल क्लासरूम, लैंग्वेज लॅब, विज्ञान प्रयोगशाळा आदी अत्याधुनिक सुविधांचाही वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी रेमेडियल टीचिंग, पेअर टीचिंग, प्रकट वाचन यासारख्या वैविध्यपूर्ण घटकांचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांच्या विविध आकलन क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी विविधांगी परीक्षा पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये लेखी परीक्षेसोबतच ओपन बुक टेस्ट, ऑनलाईन टेस्ट, गट चर्चा, शैक्षणिक प्रकल्प , दैनंदिन अध्यापन प्रक्रियेतील विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग आदी बाबींचाही समावेश करण्यात येतो. शाळेच्या इयत्ता दहावीच्या चार बॅचेस बाहेर पडल्या असून चारही वर्षी 100% निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे.

उपक्रमशील शाळा

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच संस्कारक्षम सहशैक्षणिक उपक्रम देखील शाळेत राबविले जातात. विद्यार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधीचा विचार करून संस्कृत व जर्मन या भाषा देखील शाळेमध्ये शिकविल्या जातात. परकीय भाषा शिकविणारी डेक्कन स्कूल ही शिरूर मधील एकमेव शाळा आहे. मुलांच्या मनामध्ये मूल्य संस्कार रुजविण्यासाठी शाळेच्या दैनंदिन प्रार्थनेत ओंकार , गायत्रीमंत्र, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, मारुतीस्तोत्र, रामरक्षा आदींचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात शाळेतील विद्यार्थी विविध गणपती मंडळांसमोर अथर्वशीर्ष पठण करतात. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आई वडिलांचे पाद्यपूजन करून विद्यार्थी कृतज्ञता व्यक्त करतात. विद्यारंभ संस्कार, अग्निहोत्र आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय परंपरेचा उज्वल वारसा विद्यार्थ्यांना हस्तांतरित होतो. शाळेमध्ये प्रत्येक भारतीय सण साजरा केला जातो. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन या संस्थेमार्फत दर शनिवारी शाळेमध्ये संस्कार वर्ग घेण्यात येतो. तसेच अहिल्यानगर येथील भारतीय संस्कृती संवर्धन संस्था या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत आदींविषयी प्रशिक्षण देऊन स्पर्धा घेण्यात येते. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन देखील उज्वल भारतीय परंपरेला समर्पक असेच असते. शाळेमध्ये ओलंपियाड स्पेल बी सिल्व्हर झोन मंथन रंगोत्सव आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते व यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन दैदिप्यमान यश प्राप्त करतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेमध्ये हार्मोनियम पखवाज तबला भरतनाट्यम आधी छंद वर्ग देखील उपलब्ध आहेत. शाळेमध्ये अबॅकस, रोबोटिक्स , कोडिंग डिकोडिंग आदी सह शैक्षणिक उपक्रम देखील राबविले जातात. दिल्ली येथील युवा अनस्टोपेबल या संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी CSR योजने अंतर्गत 25 लाख रुपयांची स्टेम लॅब उभारण्यात येत असून विद्यार्थ्यांना शास्त्र व गणित या विषयातील आधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी या स्टेम लॅब चा उपयोग होईल. शाळेमध्ये दरवर्षी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमात ध्वजारोहणाचा मान माजी सैनिकास दिला जातो तसेच विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले जातात. शिरूर व परिसरातील विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डेक्कन स्कूलच्या वतीने दरवर्षी विष्णू गणेश पिंगळे आंतर शालेय समूहगीत स्पर्धा, आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा, स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा तसेच डॉ एपीजे अब्दुल कलाम आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. तसेच सायन्स क्लब च्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळेतील मुलांसाठी विविध वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

आगामी उपक्रम

नवीन राष्टीय शैक्षणिक धोरणा नुसार विद्यार्थांना शालेय शिक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी शाळेने बागकाम, सुतार काम, अत्तर, साबण, मेणबत्ती बनविणे आदी व्यावसायिक कौशल्य विकसित करणारे उपक्रम राबविले आहेत. शिरूर मधील इतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना देखील व्यावसायिक प्रशिक्षण शाळेतील शिक्षकांनी दिले आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेने पाबळ येथील विज्ञान आश्रमाशी शैक्षणिक करार केला आहे. परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन संस्थेने शिरूर येथील शैक्षणिक संकुलात नवीन मराठी माध्यमाची (सेमी इंग्लिश) दर्जेदार शाळा सुरू करण्याचे ठरविले असून या शाळेचे इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत.

एकूणच शिरूरमधील विद्यार्थ्यांसाठी पुण्यासारखेच दर्जेदार शिक्षण माफक दरात उपलब्ध करून देशाचे सुसंस्कारित जबाबदार नागरिक घडविण्याचे काम डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बाबुराव नगर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मागील 9 वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. आपणही आजच बाबुराव नगर येथील या शैक्षणिक संकुलास आजच भेट देऊन आपल्या पाल्याचे उज्वल भवितव्य सुनिश्चित करावे..@ प्राचार्य डॉ. समीर ओंकार @

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button