शैक्षणिक
Related Articles
मानव्यविद्याशाखा तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांमधील सेतू : डॉ. प्रभाकर देसाई
September 23, 2026
सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘न्यूट्रिशनल डे’ उत्साहात
September 22, 2026
कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिरूरमध्ये प्रतिमेची मिरवणूक
September 22, 2026
आंतर शालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेत डेक्कन स्कूल शिरुरला प्रथम क्रमांक
विज्ञान दिनानिमित्त दिनांक एक मार्च 2025 रोजी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शिरूर व परिसरातील दहा शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घघाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले . कुटे यांच्या हस्ते सर सी. व्ही .रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
. यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य नीरज राय, विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्हि.डि.कुलकर्णी, ज्ञानगंगा शाळेचे डॉ. नितीन घावटे , डेक्कन स्कूल चे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, सुधाकर पोटे, गणेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. चंद्रकांत धापटे व व प्रा. अलका बेलोटे यांनी काम पाहिले.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी, बायो फ्युएल , स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम , स्वच्छ भारत आधी विषयांवर प्रकल्प सादर केले. स्पर्धेतील विजेत्या संघांना डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचवेळी डेक्कन स्कूलच्या वेबसाईटचे देखील उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा मान डेक्कन स्कूल ला मिळाला . डेक्कन स्कूल मधील शिक्षक लहू धारजे व सोनाली लोखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

