
- शिरूर दिनांक ( वार्ताहर ) रथसप्तमी चे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर ने आयोजित केलेल्या आंतर शालेय सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेत विविध शाळांच्या १७ संघामधून ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.यामध्ये शिरूर शहरातील दहा शाळांमधील मुलांचे ९ संघ व मुलींचे ८ संघ सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घघाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा विभाग प्रमुख खेमराज रणपिसे तसेच क्रीडा संचालक श्री. स्वप्नील देशमुख यांच्या हस्ते झाले.यावेळी मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार , शालेय सल्लागार समितीचे सदस्य दत्तात्रेय धोंगडे, गणेश मराठे, श् नाना पोटे , संध्या कुलकर्णी, डेक्कन स्कूल पूर्व प्राथमिक विभाग समन्वयक डायना बोरडे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
मुली
प्रथम क्रमांक – डेक्कन स्कूल शिरूर
द्वितीय क्रमांक – विद्याधाम प्रशाला शिरूर
तृतीय क्रमांक – शिरूर नगरपरिषद शाळा क्रं. ५
उत्तेजनार्थ पारितोषिक – पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर.

मुले
प्रथम क्रमांक – डेक्कन स्कूल शिरूर
द्वितीय क्रमांक – पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर
तृतीय क्रमांक – बालाजी विश्वविद्यालय, शिरूर
उत्तेजनार्थ पारितोषिक – शिरूर नगरपरिषद शाळा क्रं.१

स्पर्धेचे परीक्षक म्हणून दादासाहेब उदमले , स्वप्नील देशमुख, राजेंद्र वर्पे व अपर्णा वाळसे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे नियोजन क्रीडाशिक्षक चंद्रकांत झांजे यांनी केले. सूत्रसंचालन शीतल ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन सखाराम पुरी यांनी केले .

Tags
शैक्षणिक