शिरूर :
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात
शिरुर शहर परीसरात मोठ्या उत्सहात गणेश जयंती साजरी करण्यात आली .
शहरातील प्रसिद्ध असणा-या हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा हलवाई गणेशाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. नवसाला पावणा-या अशी ख्याती असणा-या हलवाई गणेशास विविध चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे. गणेश जयंती निमित्त हलवाई गणेश मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. त्याच बरोबर संगमरवरी असणा-या मंदिरावर आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली होती .
गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . हलवाई गणेश मित्र मंडळाने काही वर्षापूर्वी गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्यातून वाचलेल्या खर्चातून परिसरात ९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सह महिलासाठी महाआरती व विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जात असतात.
दरम्यान गणेश जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ संभाजीनगर (हुडको कॉलनी)
यांच्या वतीने माहेर संस्था तसे सिंधूताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालय याठिकाणी भोजन देण्यात आले . सुवर्ण युग गणेश मित्र मंडळ , युवा संघर्ष गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार , आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक ,छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी येथे ही गणेश जयंती निमित्त गणेश याग ,भजन, महाआरती महाप्रसाद अश्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंभार आळीतील विठठल मंदिरातील श्री गणेशाच्या मुर्तीची भव्य अशी मिरवणुक गणेश जयंतीनिमित्त काढण्यात आली यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या .दरम्यान अष्टविनायका पैकी एक असणा-या रांजणगाव गणपती येथील महागणपतीचा मंदिरात ही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
फोटो ओळी
हलवाई गणेश मुर्तीकरण्यात आली .