क्रीडा

बॉक्सिंग स्पर्धेत श्रवण बोखारे, पिंकी पाल यांना सुवर्णपदक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: लोणी काळभोर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल विद्यापीठात झालेल्या पुणे जिल्हा शालेय बॉक्सिंग स्पर्धेत बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. श्रवण बोखारे आणि पिंकी पाल यांनी १७ वर्षांखालील (U-17) गटात सुवर्णपदक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू अवघे १४ वर्षांचे असूनही त्यांनी वयाने मोठ्या प्रतिस्पर्ध्यांचा आत्मविश्वासाने सामना करत ही कामगिरी केली. भक्ती देविदास मोरे व जुनेद रफिक शेख यांनी रौप्यपदक, तर सुयश तोंडे याने कांस्यपदक मिळवले.

श्रवण बोखारे याला क्रीडा प्रशिक्षक रवींद्र काकडे, तर पिंकी पाल हिला अरुण दसगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सदाशिवआण्णा पवार, कार्यकारी संचालक संतोष येवले, प्राचार्य विठ्ठल तुपे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button