क्रीडा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कंपनीतून लाखो रुपयांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.


तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी १) विकास संतोष पवार (वय २७, रा. मुखई, इंदिरानगर, ता. शिरूर), २) रोहित गणेश शिंदे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), ३) ओमकार फकीरया काळे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे) यांना शिताफीने ताब्यात घेतले.


