धार्मिंक
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इच्छापूर्ती साईबाबा पालखी सोहळ्यासाठी साईभक्त शांताराम ओहोळ यांनी पालखी रथाकरीता चारचाकी वाहन भेट म्हणून दिले आहे . शिरुर येथील पत्रकार अनिल सोनवणे व मित्र परीवाराने शिरुर ते शिर्डी इच्छापूर्ती साईबाबा पालखी सोहळ्या सुरु केला आहे . पालखी सोहळ्या गेल्या तीन वर्षापासून दीडशे ते दोनशे महिला पुरुष सहभागी होतात . इच्छापूर्ती साईबाबा पालखी सोहळ्यासाठी चार चाकी वाहनांचा रथ असावा अशी इच्छा या कार्यकर्त्यांनी व भाविकांनी व्यक्त केली होती. त्यासाठी चार चाकी वाहन पाहण्याचे काम कार्यकर्ते करत होते.पालखी रथ बनवण्यासाठी चारचाकी वाहन पाहत असताना पालखी सोहळ्यास पिंपरी कोलंदर , ता .श्रीगोंदा अहिल्यानगर येथील दानशूर शांताराम ओहोळ कुटुंबीयांनी चारचाकी वाहन भेट म्हणून दिले .