शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम) शिरुर पोलीसांनी गोवा बनावटीची ६० लाख रु ३६ हजार रु किमंतीची अवैधरित्या विनापरवाना दारु व ही दारु घेवून जाणारा १५ लाख रु किमंतीचा ट्रक असा एकूण ७५ लाख रु.च्या माल जप्त केला असून वाहनचालकास ताब्यात घेतले आहे .
याबाबत माहिती देताना पोलीसांनी सांगितले की दिनांक १० मार्च २०२५ रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आप्पसाहेब कदम व शेखर झाडबुके हे दोघेजण वाहतुक नियमन डयुटी करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरूर गावचे हद्दीत बो-हाडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोलपंपासमोर गोवा येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कंपनीचा टेम्पो एम .एच. ४८ सी. बी. ३६०५ हा उभा आहे.

त्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, निरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस पथकासह बो-हाडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोलपंपासमोर जावून टाटा कंपनीचा टेम्पो एम .एच .४८ सी .बी. ३६०५ यावरील चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख, वय ३७वर्ष, रा रूम नंबर ५/७ आझाद नगर झोपडपट्टी जैनक स्टोअर्स जवळ जी एस टेलर घाटकोपर वेस्ट मुंबई यास गुन्हयाचे कामी अटक केली . या गुन्हयामध्ये ६०,४८,०००/- रूपयाची गोवा बनावटीची दारू १५ लाख रु . किमंतीचा टाटा कपंनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयामध्ये एकुण ७५,४८,०००/-रूपये माल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत.
ही कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अमंलदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार निरज पिसाळ, सचिन भोई, नितेश थोरात, आदीनी केला .

