शैक्षणिक

कॉमर्स मध्ये सीए, सी एस, सी एम ए हे सर्वोत्तम करिअर 

वाघ प्रोफेशल ॲकडमीतील व्याख्यानात सी .एस .पवन छरेजा यांचे प्रतिपादन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )कॉमर्स मध्ये सीए, सी एस, सी एम ए हे सर्वोत्तम करिअर  असल्याचे सी . एस पवन छरेजा म्हणाले .यशवंत वसाहतीतील वाघ प्रोफेशनल अकॅडमीचा वतीने  कॉमर्स मधील करियर  या विषयातील करियर संधी या वर  मार्गदर्शन करणारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये काम करणारे सी .एस .पवन छरेजा यांनी सीए , सी .एस . ,सी .एम. ए. या क्षेत्रात भारतात आणि परदेशात असलेल्या संधी विषयी मार्गदर्शन केले. जेवढे लवकर तयारी करता येईल आणि पास होता येईल तेवढे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे आहे असेही ते म्हणाले.

वाघ प्रोफेशनल ॲकडमीत मार्गदर्शन करताना

केंद्र सरकार चे नवीन आर्थिक धोरण, जीएसटी, नवीन कर प्रणाली या मध्ये प्रोफेशनल करिअर मध्ये अनेक संधी उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून असे करिअर निवडावे असे आवाहन त्यांनी केले. वाघ प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने कॉमर्स मधील करिअर संधी यावर विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत या मध्ये लॉ, मॅनेजमेंट, शेअर मार्केट वगैरे मधील नवीन पर्याय या वर दर रविवारी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे असे वाघ प्रोफेशनल अकॅडमी चे चैतन्य वाघ  यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button