शैक्षणिक
राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेत डी. फार्मसी विभागात प्रथम क्रमांक सय्यद अल्ताफ व शिकारे श्रीअनंता (मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई)यांचा तर बी. फार्मसी. विभागातून प्रथम क्रमांक अभिषेक कोळी व सानिका साळुंखे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे) यांचा
सिताबाई थिटे फार्मसी कॉलेज मध्ये स्पर्धा संपन्न झाला
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट 24 टीम ) राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेत डी. फार्मसी विभागात प्रथम क्रमांक सय्यद अल्ताफ व शिकारे श्रीअनंता (मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई)यांचा तर बी. फार्मसी. विभागातून प्रथम क्रमांक अभिषेक कोळी व सानिका साळुंखे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे) यांचा आल .
श्री .छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी व बी. फार्मसी शिरुर तसेच इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रॅंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे, अहिल्यानगर विभागातील एकूण ५४ गटांनी सहभाग घेतला .



स्पर्धेचे उद्घघाटन प्रा . डॉ. नारायण घनगावकर, डॉ. सचिन कोतवाल, बाबाजी गलांडे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती , प्राचार्य अमोल शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. नारायण घणगावकर यांनी विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील संधी बाबत मार्गदर्शन केले. डॉ. अमोल शहा यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होत असताना त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असल्याचे सांगून अशा स्पर्धांमुळे त्यांचा आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, सादरीकरण कौशल्य या सर्व कौशल्यांचे दृढीकरण होते असे मत व्यक्त केले डॉ. द्वारकादास बाहेती यांनी या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांतील संशोधन कौशल्य वृद्धिंगत होण्यास सहकार्य होते असे मत व्यक्त केले .

या स्पर्धेमध्ये डी. फार्मसी विभागातून प्रथम क्रमांक सय्यद अल्ताफ व शिकारे श्रीअनंता (मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई), द्वितीय क्रमांक महाडिक अदिती व साळवे कृतिका (विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फाॅर वुमन्स, आळे) तर तृतीय क्रमांक शेळके ऋषिकेश व आसवले श्रद्धा (मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव, अकोले) आणि फराहानाज नईम व सलोनी मुंडे (फॅकल्टी ऑफ फार्मसी काष्टी , श्रीगोंदा) यांनी पटकावला.



बी. फार्मसी. विभागातून प्रथम क्रमांक अभिषेक कोळी व सानिका साळुंखे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे), द्वितीय क्रमांक असिला शेख व यु. सय्यद (सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा) तर तृतीय क्रमांक यश कणसे व करण इंगोले (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी) यांनी पटकावला.
या स्पर्धेसाठी डॉ. सचिन कोतवाल व डॉ. नारायण घनगावकर यांनी परीक्षक म्हणून काम केले .
यावेळी संयोजन समिती सदस्य डॉ. अमित लुंकड प्रा .भाग्यश्री तळोले प्रा. सारिका झाडे, प्रा. मानसी गडदरे , प्रा. हेमांगी झिंजुर्के, प्रा. निखिल केदारी आदी उपस्थित होते .
संस्थेचे अध्यक्ष डॉ .राजेंद्र थिटे व सचिव धनंजय थिटे, यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. मनोज तारे व प्रा. विशाल कारखिले यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अमित लुंकड यांनी आभार प्रदर्शन केले.
