
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}जोशीवाडी (ता. शिरूर) येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आल्याची माहिती मिळताच वन विभाग, शिरूर यांच्या वतीने तातडीने शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) सुरू करण्यात आली.
असल्याची माहिती तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.सध्या पांजरपोळ परिसरात एक पिंजरा लावण्यात आला असून, आज आणखी दोन पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासोबतच ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी व त्यांना रात्री एकटे बाहेर सोडू नये. घरासमोर पुरेसा उजेड ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान आमदाबाद (ता. शिरूर) येथील पोपट तुकाराम गायकवाड यांच्या मालकीच्या गट क्रमांक ५५३ मध्ये वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट अडकली. या बिबट्याचे वय अंदाजे ७ ते ८ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज तालुका वन अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.मागील काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित ठिकाणी पिंजरा लावला होता. आज सकाळच्या सुमारास मादी बिबट पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आहे.


