त्यानिमित्त श्री. इच्छापूर्ती साईबाबा पादुका पालखी सोहळा समिती शिरूर यांच्या वतीने शांताराम ओहोळ त्यांच्या पत्नी सौ.नंदा शांताराम ओहोळ, मुलगा अनिकेत शांताराम ओहोळ, सून श्रुतिका अनिकेत ओहोळ यांचा सत्कार करण्यात आला.
शांताराम वोव्हाळ त्यांचे चिरंजीव अनिकेत व संपूर्ण कुटुंबीय यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात आले व गाडी पालखी समितीला अर्पण केली.
यावेळी पालखी समितीच्या वतीने शांताराम वोव्हाळ व त्यांच्या कुटुंबीय यांचा साई प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी साई पालखी समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल सोनवणे, पत्रकार मुकुंद ढोबळे, संयोजक दादाभाऊ लोखंडे,अध्यक्ष स्वप्निल रणदिवे, रामभाऊ इंगळे, माजी उपाध्यक्ष सोनु काळुखे,कार्याध्यक्ष बंटी जोगदंड, उपाध्यक्ष तुषार भवाळ, संयोजक संदेश रासकर, ऋषी ससाने, रिया ऋषी ससाणे,बजरंग सेना अध्यक्ष उमेश शेळके,पालखी समितेचे आधार स्तंभ विकास पठारे,अजित (पप्पू)ठोंबरे,प्रकाश पठारे,अनिकेत वोव्हाळ,मोसीन तांबोळी (फिटर), संकेत पाडळे,प्रसन्न भोसले उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक उमेश शेळके यांनी केले तर आभार स्वप्निल रणदिवे यांनी मानले.