क्राईम

शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या सराईत दोन महीला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाने केले जेरबंद


शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या सराईत दोन महीला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ मे २०२५ रोजी दुपारी शिरूर बस स्थानक येथुन रूपाली अनिल काळेल रा .त्रिमूर्ती नगर भिगवण रोड ,जळोची बारामती ,ता. बारामती जिल्हा पुणे व त्यांची मुलगी तन्वी व भाची साक्षी असे तिघी घरी बारामती येथे जाणेसाठी बस स्थानकातून  न्हावरा केडगाव चौफुला एस. टी. बस क्रमांक एम. एच .१४ -बी. टी. ४१९३ मध्ये जाण्यासाठी चढत असताना अज्ञात चोरटयाने ३ लाख ९० हजार किमंती साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण , ७८ हजार रु किमंती सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे कानातील झुबे असे एकूण ४ लाख ६८ हजार रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून घेवुन गेले होते .
या बाबत पोलीस स्टेशनला गुन्हा  दाखल करण्यात आला होता व गुन्हयाचा  तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप हे करीत होते .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोसई दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महीला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचे तपास पथक तयार करून संयुक्त कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या . त्याअनुशंगाने तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी शिरूर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्हयामध्ये श्रीरामपुर तालुक्यामधील सुमारे १०० पेक्षा जास्त सी. सी. टी. व्ही. फुटेज यांची तपासणी करून तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे शोध घेवून गुन्हा उघडकीस आणला. त्याआधारे सदरचा गुन्हा १) मनिषा विजय कसबे २) शोभा शंकर दामोदर रा. संजयनगर श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर यांनी केल्याचे तपासमध्ये निष्पन्न झाले. त्याअनुशंगाने तपास पथके ही श्रीरामपुर, जिल्हा अहिल्यानगर येथे रवाना होवून या दोघीना ताब्यात घेवुन त्यांचेकडे प्राथमिक  चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे गंठण व सोन्याचे कानातील झुबे जप्त करण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांना डेली न्युज पोस्ट २४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा तपास पोलीस अधिक्षक संदीप गिल ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, शिरूर संदेश केंजळे , स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोसई दिलीप पवार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महिला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचे पोलीस पथकाने केला .

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र दत्तात्रय देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button