Uncategorized
बाबूराव दौडकर स्मारक समिती अध्यक्षपदी नोटरी धर्मेंद्र खांडरे
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत सन २०२५ ते २०२८ च्या त्रैवार्षीक कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नोटरी धर्मेंद्र खांडरे यांची फेरनिवड करण्यात आली तर सचिव हेमंत दाभाडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली .

उपाध्यक्ष म्हणून धनंजय गायकवाड , कोषाध्यक्षपदी सागर फराटे सहसचिवपदी नारायण शिंदे तर विठ्ठल वाघ, दत्तात्रय दरेकर, तानाजी राउत व सुरेश पडोळे यांची विश्वस्त म्हणुन निवड झाली . अविनाश भेगडे, बाळासाहेब पुंडे व गणेश देशमुख यांची विशेष निमंत्रित म्हणुन निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेचे विनायकराव थोरात यांनी काम पाहीले.

स्मारक समिती गेली २८ वर्षे शिरुर तालुक्यातील कृषी व ग्रामविकासात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे .

नोटरी खांडरे संस्थेच्या स्थापनेपासुनच कार्यरत असून संस्था उभारणीत त्यांनी केलेले योगदान महत्वाचे आहे, प्रामाणिकपणा, सर्वदुर संपर्क आणि संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेतक-यांसाठी जे अनेक कार्यक्रम व उपक्रम राबविले त्यामुळे संस्था नावारुपाला आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा विचारात घेउन एकमुखाने त्यांच्याकडे समितीची धुरा पुन्हा देण्यात आली,

अध्यक्ष निवडी नंतर बोलताना खांडरे यांनी सांगितले की, पुढील काळात संस्थेच्या वतीने शेतीसोबतच जल, पर्यावरण, ग्रामविकास, शेती तंत्रज्ञान आणि सेवा या क्षेत्रात वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरुणांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले .

