अपघात

टॅकरच्या धडकेत ३० वर्षाच्या युवक मृत्युमुखी

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )टॅकरचा धडकेत ३० वर्षीय युवकाचा मृत्यु झाला आहे .सूरज संतोष धायगुडे, वय ३०  वर्ष, रा. अकोले, ता. इंदापुर, जि. पुणे  असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे .मांडवगण फराटा कोळगाव डोळस रस्त्यावर हा अपघात झाला .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  समिर संतोष धायगुडे, , रा. अकोले, ता. इंदापुर, जि. पुणे यांनी टॅकर एम. एच. १३ सी. यू. ८७७६  वरील चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे रा. सवारी, ता. निलंगा, जि. लातूर यांचा विरोधात फिर्याद दिली आहे .हा अपघात ६ जून रोजी  मांडवगण फराटा येथे कोळगाव डोळस ते मांडवगण फराटा रोडचे काम चालू असताना विलास रामराव फराटे यांचे घराचे समोर रस्त्याचे काम चालू असताना डांबराचा टँकर वरील चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे रा. सवारी, ता. निलंगा, जि. लातूर याने टॅकर  हायगईने व अविचाराने वेगात चालवून   सुरज संतोष धायगुडे  यास धडक दिली धडकेत त्यांचे उजवे बाजूचे बरगडीला तसेच उजवे हातास गंभीर व किरकोळ दुखापत होवून तो मरण पावला .पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा मार्गदर्शनाखाली अपघाताचा आधिक तपास केला जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button