महाराष्ट्रशैक्षणिक

डेक्कन इंग्लिश मिडियम स्कूल शिरूर च्या आरुष पाटीलची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड. 

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} येथील डेक्कन इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी आरुष राहुल पाटील यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या संस्थेच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. रमण स्पेस ऑलिम्पियाड या जागतिक स्तरावरील स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त करून आरुष पाटील याने आपले इस्रो दौऱ्यातील स्थान पक्के केले आहे. लहानपणी पासूनच आरुषला विज्ञान विषयाची विशेष आवड असून त्याने शालेय जीवनातच विज्ञान विषयातील अनेक छोटे मोठे प्रकल्प बनवले आहेत. तसेच त्याने विद्यार्थी विज्ञान मंथन सारख्या स्पर्धांतून यश देखील मिळवले असून यापूर्वी त्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अभ्यास दौऱ्यासाठी देखील निवड झाली होती. 24 ते 28 मे दरम्यान इस्रो च्या अहमदाबाद केंद्राला भेट देण्यासाठी आरुष पाटील सह भारतातील विविध प्रदेशातून निवड झालेले बाल वैज्ञानिक येणार असून या चार दिवसीय कार्यशाळेत विविध प्रयोग तसेच नामवंत शास्त्रज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी देखील या बाल वैज्ञानिकांना मिळणार आहे. आरुष चे वडील राहुल पाटील यांनी देखील पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याच स्पर्धेत डेक्कन स्कूल मधील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी समीक्षा ठोंबरे तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी शिविका झासकर यांची राज्यस्तरावरील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून पुण्यातील आयुका व आयसर या विज्ञान संस्थांना भेट देण्याची संधी त्यांना मिळणार आहे. रमण स्पेस ऑलिम्पियाड साठी सर्व विद्यार्थ्यांना डेक्कन स्कूल मधील विज्ञान शिक्षक श्री. लवू धारजे , प्राचार्य डॉ समीर ओंकार व आय आय टी खरगपूर येथील डॉ. युवराज गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्याच्या या उत्तुंग यशा बद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष ॲड. अशोकराव पलांडे, शाळा समिती अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी त्याचे अभिनंदन केले.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button