Uncategorized
Check Also
Close
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम )शिरूर शहरात प्रथमच पक्षीय पातळीवर नगरपालिका निवडणूक झाल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्या मध्ये मोठा जोश निर्माण झाला या निवडणुकीत भाजपा या पक्षाला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या.
तर प्रमुख पराभूत उमेदवारा
शहरातील काही प्रभागातील निवडणूका या अटीतटीच्या आणी हाय व्होल्टेज झाल्या . अनेक प्रभागात पक्षांची व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती..
त्यांची गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या प्रभागावर पकड आहे. त्याच्या पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने नीलम गुलाब धाडीवाल या मैदानात उतरल्या होत्या. त्याचे वडील गुलाब धाडीवाल हे थेट जनतेतून झालेल्या नगराध्यक्ष पदाचा निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते.
तर मातोश्री लत्ताबाई धाडीवाल या शहराच्या उपनगराध्यक्षा राहिल्या आहेत. तर बंधू सचिन धाडीवाल हे नगरपालिकेच्या मागील टर्म मध्ये नगरसेवक राहिलेले आहे. नीलम यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी असून धाडीवाल परिवाराचा प्रभावी जनसंपर्क या नीलम धाडीवाल यांच्या जमेच्या बाजू होत्या. तर याच ठिकाणी भाजपाच्या वतीने संगीता वेताळ ही मैदानात होत्या.. धाडीवाल व मल्लाव यांची लढतीत संगीता मल्लाव यांचा विजय झाला.





