क्राईम

पोलीस असल्याचे सांगून हातचलाखी; १.४० लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

  1. शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}पोलीस असल्याची बतावणी करून विश्वास संपादन करत दोन अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने चोरून नेल्याची घटना शिरूर शहरात घडली आहे.

    याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १२१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१६(२), ३(५), २०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही घटना दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ३.५५ वाजण्याच्या सुमारास वेदांत हॉस्पिटल शेजारील डायग्नॉस्टिक सेंटर परिसरात, पुणे–नगर महामार्गावरील चहाच्या टपरीजवळ घडली. दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस आम्ही पोलीस आहोत असे सांगून अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. फिर्यादीने विश्वासाने अंदाजे १० ग्रॅम वजनाच्या (प्रत्येकी ५ ग्रॅम) दोन सोन्याच्या अंगठ्या रुमालात ठेवून घेतल्यानंतर आरोपींनी हातचलाखी करून त्या लंपास केल्या.

    चोरीस गेलेल्या अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे १,४०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत. पपोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button