शिरूर : ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) – “शिकण्याची उर्मी असेल तर वय कधीच अडसर ठरत नाही,” हे अगदी खरे करून दाखवले आहे शिरूरचे बाबूराव कोंडिंबा पाचंगे यांनी. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी विधीची पदवी प्राप्त करत वकिलीचे स्वप्न साकार केले आहे.

आपले पदवीचे शिक्षण पूर्ण व्हावे व पदवी मिळावी असे स्वप्न होते व या स्वप्ना पर्यत जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. अश्या वेळी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. चंद्रकांत धापटे व प्रा . सतिश धुमाळ यांची भेट झाली. परिस्थिती व अन्य कारणामुळे ज्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करता येत नाही असे विद्यार्थी, नागरिक हे मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करु शकतात तुम्ही ॲडमिशन घ्या असे त्यानी सांगितले व माझ्या पदवीकडे जाण्याचा मार्ग निश्चित झाला असे पाचंगे यांनी सांगितले.
बोरा महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर ॲडमिशन घेतले. कामाचा व्याप, वाढते वय ,यामुळे अभ्यासाचा ताण येत होता पण कोणत्याही परिस्थितीत पदवीचे स्वप्न साकारायचे ही जिद्द, या सर्व
त्याच बरोबर शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम व बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते , प्रा डॉ . अंबादास केत यांनी ही मौलिक मार्गदर्शन केले. त्याच बरोबर शाहू शिक्षण संस्थेचे विश्वस्त ॲड . नारायणराव साठे, सी . डी देशमुख विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ॲड . रियाज बेग, प्राचार्य ॲड 
