Uncategorized
शिरूर मधील सोन्या चांदीचे दुकानात लाखो रु.च्या दागिन्याची चोरी

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -२४}
- शिरूर शहरातील भर मध्यवस्तीत असणारा हलवाई चौक परिसरातील अमोल ज्वेलर्स या सोन्या चांदीचे दुकानात लाखो रु च्या सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी केली.

oplus_131074
पहाटे चार च्या सुमारास हा दरोडाचा प्रकार घडला . एका चारचाकी वाहनातून चोरटे आल्याचे समजते. जोशी परिवाराचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. पहाटे चारच्या सुमारास चोरटे दुकानात आले व बंद असलेले बंद दुकान फोडून आत प्रवेश केल्या व दुकानातील लाखो रु. किंमतीचे दागिने चोरट्यानी चोरून नेले.

पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शिरूर शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या भागात झालेल्या या चोरीच्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.
