
oplus_131074
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने ‘एकता दिन’ आणि ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले . यात मोठया संख्येने युवक विद्यार्थीसह विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

ही मॅरेथॉन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, एसबीआय सर्कल, येथून सुरु झाली.यावेळी जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, युवक आघाडीचे संग्रामसिंह शेवाळे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,
गंगा एजयुकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे, रांजणगाव इंडस्ट्रिअल असोसिएशनचे महेंद्र पाटील,डॉ. संदीप कोकरे,गीताराम पाचंगे,उद्योजक राजेश लांडे,शिवाजी कोहोकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य विक्रम पाचुंदकर, हिलिंग लिव्हिंग फाउंडेशनचे संतोष सांबारे, डॉ. निकिता तळेकर पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, बाबूजी शिंदे, विलास आंबेकर, संतोष औटी,कारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल कारेगाव, ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कुल शिरूरचे विद्यार्थी, माजी सैनिक आदी यात सहभागी झाले होते.
युवकांसाठी या दौडचे आयोजन केल्याबद्दल संग्रामसिंह शेवाळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी सभापती विश्वास कोहोकडे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचे अंतर २ किमी, ३ किमी आणि ५ किमी असे ठेवण्यात आले होते.
मॅरेथॉनचा मार्ग एसबीआय सर्कल, कारेगाव ते जितून कंपनी असा निश्चित करण्यात आला होता. 
या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय एकतेचा संदेश देत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन देशाच्या ऐक्याचा संकल्प दृढ करावा असे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
२ कि मी गटातील विजेते -ओम संतोष काकडे,उमेश दीक्षित.बाबाजी उबाळे
३ कि. मी गटातील विजेते -आदित्य जावळे,अक्षय डहाळे, जागृती पाटील
५ कि मी मधील विजेते -सोपान गोडसे
अभिजित सोनवणे,राहुल काशिदे
Check Also
Close
