निधन वृत्त

माजी नगरसेवक रामदास शिर्के यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: कुंभार आळी येथील ज्येष्ठ वीट व्यवसायिक तथा माजी नगरसेवक रामदास बाबुराव शिर्के (वय ७५) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. वीट व बांधकाम व्यवसायिक विजय शिर्के आणि निलेश शिर्के यांचे ते वडील होत.
रामदास शिर्के यांनी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच परिसरातील सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली  अर्पण केली.दशक्रिया विधी शुक्रवारी दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी आठ वाजता कुंभार घाट, शिरूर येथे असून ह. भ. प. किरणमहाराज भागवत यांचे प्रवचन होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button