क्राईम

दारु पिण्यास पैसे न दिल्याचा रागातून दगडाने मारहाण शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने दगडाने मारहाण शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रदिप शाहु गायकवाड, वय २८ वर्ष धंदा रिक्षा चालक, रा. आण्णापुर ता शिरूर जि पुणे यांनी जीवन चंद्रकांत सकट , देवा संजय पठारे , रोहीत दिपक भोंडे सर्व रा. आण्णापुर ता. शिरूर ,जि .पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
१८ मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याचा सुमारास रामलिंग, ता . शिरूर येथील बालाजी शाळेचे जवळ रामलिंग आण्णापुर रोडवर प्रदीप गायकवाड रिक्षा घेवुन आण्णापुर येथे घरी जात असताना जीवन चंद्रकांत सकट , देवा संजय पठारे , रोहीत दिपक भोंडे सर्व रा. आण्णापुर ता शिरूर जि. पुणे हे ॲक्टीव्हा मोटार सायकल वरून पाठीमागुन आले व गायकवाड यांच्या रिक्षाला मोटार सायकल आडवी लावली. आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दे नाहीतर तुला लय मारील असे म्हणाले त्यावेळी गायकवाड यांनी पैसे देण्यासाठी नकार दिला असता त्यांना दगडाने डोक्यात, पायावर मारहाण करून दुखापत केली व शिवीगाळ दमदाटी करून निघुन गेले.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राउत तपास करीत आहेत .

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र दत्तात्रय देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button