शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)कोकरु देत नाही याचा रागातून कोयत्याने दुखापत करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ रघुनाथ रुपणेर वय ३५ वर्ष व्यवसाय शेती व मेंढपाळ रा. कान्हूर मेसाई, गार कुलवाडी ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे . १८ मे रोजी रात्री साडेदहा वाजता रावडेवाडी ता.शिरूर जि.पुणे येथील प्रदीप तांबे यांचे शेतात सोमनाथ रुपणेर पत्नी सुमन व मुले वाघूरी जवळ झोपले असताना अमोल उर्फ युवराज लक्ष्मण तांबे रा.रावडेवाडी ता.शिरूर यांनी रुपणेर यांच्या वाघूरीतून कोकरू उचलून घेतले. रुपणेर तांबे याला म्हणाले तू कोकरू खाली ठेव मला कोकरू दयायचे नाही. कोकरू देत नाही याचा राग आल्याने तांबे हातातील कोयत्यांने मारत असताना रुपणेर यांनी डावा हात आडवा घातला असताना कोयता हाताचे कोपराजवळ पोटरीला,तळहाताला लागून रुपणेर यांना गंभीर दुखापत झाली व पुन्हा मारला तेव्हा कपाळाला घासून दुखापत झाली . रुपणेर यांची बायको सुमन सोडवायला आली असता तीला पण तू पुढे येवू नकोस नाही तर तुला पण सोडणार नाही असे बोलून दमदाटी करून शिवीगाळ केली व तेथून जाताना पोलीसात केस केली तर जिवंत ठेवणार नाही असे बोलून मारण्याची धमकी दिली म्हणून अमोल उर्फ युवराज लक्ष्मण तांबे रा.रावडेवाडी ता.शिरूर जि.पुणे यांचा विरोधात रुपणेर यांनी फिर्याद दिली आहे .
याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत .
बांधकाम व्यवसायिक राजेंद्रदादा दत्तात्रय देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ चा वतीने भावपूर्ण आदरांजली