üशिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरुर शहराचा पाणी पुरवठा शनिवार दिनांक २४ मे २०२५ पासून नियमित होणार आहे . यापूर्वी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता .
याबाबत पालिकेचा वतीने माहिती सांगण्यात आले की शिरुर शहरा करिता पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यामध्ये कुकडी विभागा मार्फत पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्यामुळे उद्या शनिवार, दिनांक 24 मे 2025 पासून शहरातील पाणीपुरवठा दररोज पूर्ववत नियमितपणे होणार आहे नागरिकांना पाणी जपून वापरावे, पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन ही शिरूर नगरपरिषद, घोडनदीचा वतीने करण्यात आले आहे .
यापूर्वी शहराला पाणी पुरवठा होत असणा-या घोडनदीवरील कोल्हापूर पध्दतीचा बंधारातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शिरुर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता .