राष्ट्रीयविशेष

यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त १२ मार्च २०२६ रोजी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या विशेष व्याख्यानाचे शिरूरच्या चांदमल ताराचंद बोरा कॉलेज मध्ये आयोजन

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: यशवंतराव यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिरूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने विशेष व्याख्यानाचे १२ मार्च २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

“यशवंतराव चव्हाण : आधुनिक महाराष्ट्राचे उद्गाते” या विषयावर हे व्याख्यान होणार असून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता हे व्याख्यान डी–२३ सभागृह (डी इमारत), सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा व कार्याचा आढावा घेत त्यांच्या आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीतल्या योगदानावर प्रकाश टाकला जाणार आहे.

सदर व्याख्यान सर्व नागरिकांसाठी खुले असल्याचे अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते व केंद्र संयोजक प्रा. डॉ. केत यांनी सांगितले.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button