क्राईम

पूर्वीच्या भांडणाचा कारणावरुन कोयत्याने वार व लोखंडी रॉडने मारहाण केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा


शिरुर दिनांक ( वार्ताहर )
पूर्वीच्या भांडणाचा कारणावरुन कोयत्याने वार व लोखंडी रॉडने मारहाण केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा विजयपाल सिंग वय ४८ वर्षे धंदा घरकाम, राहणार रामलिंग रोड, जय हनुमान सोसायटी रो हाऊस नंबर १० . ता. शिरूर जि. पुणे यांनी
ऋषिकेश गोवर्धन साबळे रा. घोटीमळा, रामलिंग ,तालुका. शिरूर,जिल्हा -पुणे व पी.आर. चायनीज सेंटर मधील दोन अनोळखी कामगार (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
जय हनुमान सोसायटीत राहणा-या रेखा सिंग, अर्चना अडसूळ असे जेवण झाल्यानंतर वॉकिंग करित होते . सोसायटीचे मेनगेट जवळ लाकडी बाकड्यावर अखिल शेख, योगेश अडसूळ, मिथुन सिंग असे बोलत बसले असताना ऋषिकेश गोवर्धन साबळे हा दारू पिऊन तिथे आला व त्याने पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून योगेश अडसूळला शिवीगाळ करून मिथुन सिंग यास खाली पाडून त्याच्या हातातील लोखंडी कोयताने मारहाण करण्यास धावल्याने रेखा सिंग तिथे गेल्या असता कोयता रेखा सिंग यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्या जवळ कोयता लागून जखम झाली. जितेंद्र सिंग यांना ही लोखंडी रॉडने दोन्ही हातावर दोन्ही पायावर मारणहाण करण्यात आली . त्यानंतर परत ऋषिकेश साबळेने मिथुन याचे डावे उजवे पायाच्या अंगठ्याजवळ लोखंडी कोयता मारून जखम केली व योगेश अडसूळ यास देखील त्याचे हातातील लोखंडी रॉडने त्याच्या दोन्ही पाय चे मांडीवर मानेवर व डोक्यात मारून दुखापत केली व रेखा सिंग यांच्या केसाला धरून खाली पाडून हाताने लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली .

यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button