शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
श्री. स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मुळ चर्म पादुका आगमन व दर्शन सोहळा शिरूर शहरातील विठ्ठल नगर येथील( रामकमल कन्स्ट्रक्शन) चे
विठ्ठल खोडदे यांच्या निवासस्थानी स्वामी छाया सोसायटी विठ्ठल नगर येथे आयोजित करण्यात आला होता.


चोळप्पा महाराज यांचे वंशज व सेवेकरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, माजी उपसरपंच भरत बो,-हाडे, लायन्स क्लब शिरूर चे माजी अध्यक्ष राजेंद्र लोळगे, व्यावसायिक किरण पठारे, गणेश पठारे, शिरूर शहर संघटनेचे रणजीत गायकवाड, बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड,श्री.संत सावता माळी प्रतिष्ठानचे किरण बनकर, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैंड, श्री स्वामी समर्थ संस्था शिरूर चे योगेश वाळकीकर,
गणेश घाडगे, बांधकाम व्यवसाय श्यामसुंदर चिखलीकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित भजन व विविध गीते भजनी मंडळांनी सादर केली.
भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.