क्राईम
शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) – शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट 2025) रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रवींद्र शिरसाठ (रा. बाबुराव नगर, शिरूर) हा तिथे आला. त्याने “आमच्या मेडिकलमध्ये पेशंटला औषधे घेण्यासाठी का पाठवत नाहीस?” असा जाब विचारत शिवीगाळ, दमदाटी केली.
त्यानंतर त्याने डॉक्टर शितोळे यांना हाताने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता शिरसाठ याने कमरेचा बेल्ट काढून डॉक्टरवर प्रहार करून दुखापत केली.

