क्राईमविशेष

28 कि.ग्रॅ. वजनाचा सात लाखांचा गांजा जप्त : दोन आरोपी अटक, एक आरोपी फरार –

शिरूर :{डेली न्यूज पोस्ट टीम -24}
रांजणगाव एम आयडीसी पोलिस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी 28 किलो वजनाचा तब्बल सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करून दोन जणांना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.दिव्या अतुल गिरे (वय 27, रा. सृष्टी सोसायटी, बाभुळसर खुर्द, मूळ रा. देवदैठण, श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) व सुरज दिलीप शिंदे (वय 28, रा. देवदैठण, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, महाविद्यालये, एमआयडीसीतील कामगार वसाहती, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक व पोलीस पाटील यांच्या सहभागातून अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांवर जनजागृती करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून विक्रेत्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिले होते.
26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोलिस निरीक्षक वाघमोडे यांना बाभुळसर खुर्द ता. शिरूर येथील सृष्टी सोसायटीतील एका रो हाऊसमध्ये गांजा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दुपारी 12.30 वाजता दोन पथकांसह त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
या कारवाईत दिव्या अतुल गिरे (वय 27, रा. सृष्टी सोसायटी, बाभुळसर खुर्द, मूळ रा. देवदैठण, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व सुरज दिलीप शिंदे (वय 28, रा. देवदैठण, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 28 किलो वजनाचा, सात लाख रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला.
तपासात उघड झाले की हा गांजा दिव्या गिरे हिचा पती अतुल वसंत गिरे (रा. बाभुळसर खुर्द, मूळ रा. देवदैठण, श्रीगोंदा) याने विक्रीसाठी आणून दिला होता. मात्र तो कारवाईपूर्वीच फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.डेली न्यूज पोस्ट टीम च्या वतीने हार्दिक शुभेच्छा
या प्रकरणी पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना (दिव्या गिरे व सुरज शिंदे) न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर यांनी त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिला आहे.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पो. उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.हवा. विजय सरजिने, विलास आंबेकर, पो.कॉ. गणेश वाघ, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, महिला पो.हवा. विद्या बनकर, माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, रामेश्वर आव्हाड व हेमंत इनामे यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button