Uncategorizedमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा घ्या; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांची सूचना

oplus_131074

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक सवलती आणि लाभांविषयी सविस्तर माहिती मिळावी यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, अशी,सूचना शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान, शिरूर यांच्या वतीने जीवन विकास मंदिर शाळेत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, नगरसेविका चारुशीला कोळपकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, इंद्रभान कळमकर, विजय शेजवळ, राजू मैड, मोहम्मद हुसेन पाटील, बाळासाहेब झाडगे, मनोज ओतारी, राजू शेजवळ, रामभाऊ इंगळे, सुधाकर ओतारी, कन्हैयालाल दुगड, मुख्याध्यापक गंगाधर तोडमल आदी उपस्थित होते.कार्यक्रमात सनदी लेखापाल (सीए) परीक्षा उत्तीर्ण

सनदी लेखापाल परीक्षा झालेल्या विधी विनोद बोथरा यांचा रसिक विचार मंच व व्हिडीएस ९३ च्या वतीने सत्कार करताना संदीप बिहाणी प्राचार्य अमोल शहा सामाजिक कार्यकर्ते बीजवंत शिंदे, संजय बाफना,सुनील उर्फ दादा चौधरी,मुकेश संघवी, प्रशांत थोरात,माजी उपसरपंच संभाजीराव कर्डिले, दिलिप शेख, अतुल बोथरा व अन्य मान्यवर

झालेल्या विधी विनोद बोथरा आणि प्रकर्ष दुगड यांच्यासह अनुष्या शेजवळ, रिद्धी अभिजित ओतारी, आयेशा शेख, इक्सार चौधरी, आर्या जाधव, राजू दगडू त्रिमूखे, पूर्वा दुगड या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षक विजय शेजवळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा पाचर्णे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासातून आपले ध्येय निश्चित करावे. शासनाच्या शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजनांची माहिती प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी कार्यशाळांचे आयोजन आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या कार्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.

पालकांनी आपल्या पाल्यांवर विशिष्ट करिअरची सक्ती करू नये. मुलांच्या आवडी-निवडी समजून घेऊन त्यांना आनंदी वातावरणात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, इंद्रभान कळमकर, राजू मैड आणि प्रा. सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बारवकर यांनी केले, तर स्वागत बाळासाहेब झाडगे यांनी केले. आभार राजू शेजवळ यांनी मानले.

यावेळी शिरूर नगरपरिषदेची शाळा, विद्याधाम प्रशाला, रयत शाळा, स्वामी विवेकानंद आश्रम शाळा, माहेर संस्था, जीवन विकास मंदिर आणि आयेशा बेगम उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या व साहित्याचे वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button