क्राईम
इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही, याचा रागातून तरुणास मारहाण
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}डोंगरगण फाटा ता. शिरूर येथे इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणास लाकडी दांडक्यांनी तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन मळीभाऊ खामकर (वय २१, व्यवसाय – वेल्डिंग, रा. शिनगारवाडी, म्हसे बु., ता. शिरूर, जि. पुणे) हा दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅब्रीकेशनचे काम करीत होता.
यावेळी आरोपी अमर मुंजाळ (रा. डोंगरगण), हर्षद खाडे व करण चव्हाण (दोघे रा. म्हसे बु.) तसेच सचिन पवार (पत्ता माहित नाही) हे चौघेजण तेथे आले.
फिर्यादी खामकर याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही, याचा राग मनात धरून आरोपींनी एकत्र येऊन त्याला मारहाण केली.लाकडी दांडक्यांनी तसेच हात-पायाने मारहाण करून खामकर याला गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी खामकर याच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुरनं. ६८९/२०२५ भा. न्या. सं. कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


