विशेष
शिरूर बायपास रस्त्या बनला मृत्यूचा सापळा

काही वर्षां पूर्वी पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील वाढलेली वाहनाची संख्या यामुळे शिरूर शहरा बाहेरून जाणारा बायपास रस्त्या करण्यात आला. त्याच बरोबर या परिसरातील नागरीकरण ही मोठे झपाटयाने झाले. साहजिकच या रस्त्यावरून वाहन चालवणे, दुचाकी चालवणे व पायी रस्त्यावरून चालणे एक दिव्य बनले आहे .
शिरूरच्या रिलायन्स पेट्रोल पंप पासून ते अहिल्या नगर हा रस्ता अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गच्या आखत्यारीत येतो.
गेल्या काही वर्षा पासून बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत.११ ऑगस्ट रोजी उद्योजक किशोर यादव व प्रथमेश लाड या दोन जणांच्या हॉटेल्स संग्राम जवळील डिव्हायडर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
काही महिन्या पूर्वी याच ठिकाणी शिरूर शहरातील युवकांचा मृत्यू झाला होता . त्यानंतर या ठिकाणचा डिव्हाडर बंद करण्यात आला. पण काही दिवसांनी हा डिव्हायडर पुन्हा तोडून या ठिकाणाहून बिनदक्तपणे वाहतूक सुरु झाली. डिव्हाडर तोडून तेथून वाहतूक सुरु होऊन ही हा रस्त्या ज्या यंत्रणेचा ताब्यात त्याच्या कुणाच्या ही लक्षात ही गोष्ट येत नाही हे दुर्देव आहे.
रिलायन्स पंप ते सतरा कमान पुला पर्यतचा बायपास रस्ताचे दुभाजक काही ठिकाणी फोडले असून त्या ठिकाणाहून धोकादायक पद्धतीने वाहनचालक वाहन घेऊन जातात. त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण होते. बायपास रस्त्यावरील दुभाजकाची उंची ही कमी असून या दुभाजकाच्या कमी उंची मुळे अपघात होऊ शकतात. या बायपास रस्त्याला उपनगरातून काही थेट रस्ते येऊन मिळतात.
बायपास रस्त्यावर ज्याठिकाणी असे रस्ते थेट बायपासला जोडले जातात त्याठिकाणी वाहतूक नियंत्रण दिवे अर्थात सिग्नल बसवणे गरजेचे झाले आहे. बायपास रस्त्यावरील कोळपे हॉस्पिटल समोरील रस्ता, गंगा पेट्रोल जवळील रस्ता याठिकाणी ही सिग्नल बसवणे गरजेचे आहे.

बायपास रस्त्यावर सतरा कमानीचा पुला जवळ जुन्या पुणे नगर रस्त्या जो शिरूर शहरातून येतो तो ही पुणे अहिल्या नगर रस्त्याला जोडला जातो. याठिकाणी अहिल्यानगरचा दिशेने आलेल्या काही वाहनचालकांना शिरूर शहरा कडे जाण्यासाठी रस्त्या ओलांडून जावे लागते. तर पुणे बाजू कडे अहिल्या नगरच्या दिशेने जाणारे वाहने वेगात येत असतात.
याठिकाणी रस्त्याला उतार ही आहे. साहजिकच पुणे बाजू कडून अहिल्यानगर कडे जाणारी वाहने वेगात येतात . अहिल्यानगर कडून शिरूर शहराकडे जाण्यासाठी हा रस्ता ओलंडावा लागतो. साहजिकच भरधाव वेगातील वाहनामुळे याठिकाणी अपघात ही झाले आहेत. साह जिकच याठिकाणी स्पीड बेक्रर व वाहतूक नियंत्रण दिवा बसवण्याची मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वी सुरक्षित निर्धोक व गतीने प्रवास होण्यासाठी शिरूर बायपास रस्ता झाला. पण मागील काही वर्षांपासून या परिसरात वाढलेले नागरीकरण वाढती वाहनाची संख्या यामुळे वाढलेले अपघात व प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे हा बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे.
दरम्यान कालच्या अपघाताचा घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने बायपास रस्त्यावर जिथे डिव्हायडर होते तेथे बॅरिगेट लावण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.

