राष्ट्रीय

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या प्रांगणावर भौतिकशास्त्र व बी. व्होक. (रिन्यूएबल एनर्जी) विभागाच्या वतीने आयोजित आकाशदर्शन कार्यक्रमा अंतर्गत शिरूरकरांनी व विद्यार्थ्यांनी टेलिस्कोपच्या सहाय्याने आकाशदर्शन केले.



त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात टेलिस्कोपच्या साहाय्याने विविध ग्रह व तार्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालक आणि शिरूरमधील विज्ञान प्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आकाशदर्शनाचा आनंद घेतला. विज्ञानाबद्दलची उत्सुकता वाढवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. डी. एच. बोबडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील कवादे यांनी केले, तर डॉ. सुभाष पांढरकर यांनी आभार मानले.