क्राईम
विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

शिरूर{डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मोटेवाडी, ता. शिरूर येथे वीजेचा धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अ.म.र. क्रमांक १९१/२०२५ नुसार बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मयताचे नाव भरत महादेव उघडे (वय २९, रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पाचवड, ता. परांडा, जि. धाराशिव) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटेवाडी येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रीक काम सुरू असताना भरत उघडे यांना अचानक वीजेचा जोरदार धक्का बसला.
त्यानंतर त्यांना तातडीने शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती मयताचा भाऊ बाबासाहेब महादेव उघडे (वय ३५) यांना फोनद्वारे मिळाल्यानंतर ते नातेवाईकांसह रात्री रुग्णालयात दाखल झाले. 






