महाराष्ट्र
‘शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}पुण्य परोपकार पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजा यासी ‘तुकाराम महाराजांच्या या ओवी मध्ये परोपकार म्हणजेच पुण्य असे म्हटले आहे. याच भावनेतून सामाजिक कार्यकर्ते संतोष थेऊरकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना मोफत देवदर्शन घडवले.
या देवदर्शन वारीमध्ये थेऊरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या नागरिकांप्रती दाखवलेला सेवाभाव सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
आपण ज्या परिसरात राहतो. तो परिसर जणू काय आपलं एक कुटुंबच आहे या भावनेतून त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना देवदर्शन घडवण्याचा संकल्प केला. मागील पंधरवड्यात त्यांनी दीडशेहून अधिक नागरिकांना वातानुकूलित बसेस मधून पंढरपूर तुळजापूर व अक्कलकोट देवदर्शन घडवले.प्रवास करताना नागरिकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न यावेळी थेऊरकर यांनी केला.
शहरातून निघाल्यापासून ते देवदर्शन झाल्यानंतर शिरूरला पोहोचेपर्यंत अगदी कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे थेऊरकर यांनी सर्वच नागरिकांची मनोभावे सेवा केल्याने सर्वच नागरिक भारावून गेले. या मोफत देवदर्शन सेवेविषयी या नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने प्रचंड समाधान व्यक्त केले. नागरिकांचे हे समाधान पाहून थेऊरकर यांनी लागलीच दुसऱ्या यात्रेचे नियोजन केले.
यात अडीचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष,सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर,माजी नगरसेवक पै.अशोक पवार,